Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा देशभर विशेष सहलींचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा एकदा देशभर विशेष सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.

यात बंगळुरू, मैसूरसह दक्षिण दर्शन यात्रेचा समावेश आहे.अवघ्या ९ हजार ४५० रुपयांत प्रवाशांना ७ शहरांना भेट देता येणार आहे.यात जेवण्याची आणि राहण्याचीही सोय आहे.ही सहल ९ रात्री आणि १० दिवस असणार आहे.मुंबई स्थानकवरून २९ जानेवारीला यात्रेस सुरुवात होईल.७ फेब्रुवारीला मुंबईला यात्रेचा समारोप होईल.

प्रवाशांना म्हैसूर, बंगळुरू, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, मदुराई, रामेश्वरम, तिरुपती आदी शहरांना भेटी देता येणार आहे.या शहरातील प्रमुख स्थळांना भेट देणे,त्यासाठी वाहतूक व्यवस्था,राहण्याची आणि जेवण्याची सोय आयआरसीटीसीच्या वतीनेच केली जाणार आहे.

शयनयान दर्जासाठी प्रतिव्यक्ती ९ हजार ४५० रुपये तर वातानुकूलित थ्रीटायरसाठी ११ हजार ५५५ रुपये तिकीट दर आहे.सोलापूर,कलबुर्गी,वाडी,मुंबई,कल्याण,लोणावळा,चिंचवड,पुणे या ठिकाणाहून प्रवाशांना या सहलीत सहभागी होता येईल.

Exit mobile version