Site icon साप्ताहिक एकच ध्येय

फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेत यापूर्वीच उपलब्ध असलेल्या या लसीचा वापर अनेक गरीब देशांमध्ये देखील करता येईल.

कोविड-19 साठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही लसीच्या वापरला मान्यता देण्याचा अधिकार प्रत्येक देशाच्या औषध नियामक मंडळाला असतो. मात्र आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेले देश यासाठी जागतिक आरोग्य संघटनेवर अवलंबून असतात.

फायझर बायो एन्टेकच्या लसीचं परीक्षण आपण केलं असून सुरक्षा आणि प्रभावाबाबतच्या सर्व कसोट्यांवर ही लस उतरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या लसीच्या वापरला परवानगी दिल्यानं अनेक देश ही लस आयात करू शकतील आणि तिचा आपत्कालीन वापर करू शकतील, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

Exit mobile version