मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून १८ कोटी ८७ लाखाचा दंड वसूल
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणं अनिवार्य असलं तरी मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे.
कोरोनाच्या काळात आतापर्यंत ९ लाख २५ हजार बेशिस्त मुंबईकर विनामास्क फिरताना आढळून आले असून, महानगरपालिकेच्या क्लीन अप मार्शल नं त्यांच्याकडून अंदाजे १८ कोटी ८७ लाखाचा दंड वसूल केला आहे.