Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डीआरडीओने स्थापना दिन साजरा केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज आपला 63 वा स्थापना दिवस साजरा केला.  डीडीआर सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ  जी सत्येश रेड्डी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे मॉडेल सादर केले, ज्याला नुकतीच निर्यातीसाठी मंजुरी देण्यात आली. यावेळी डीआरडीओ भवन येथे डीआरडीओचे अध्यक्ष आणि डीआरडीओ मुख्यालयाचे महासंचालक आणि संचालक यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना पुष्पांजली वाहिली.

1958 मध्ये संरक्षण क्षेत्रात संशोधन कार्य वाढवण्यासाठी केवळ 10  प्रयोगशाळांसह डीआरडीओची स्थापना केली गेली आणि भारतीय सशस्त्र दलांसाठी अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाची रचना व विकास करण्याचे काम त्यांना देण्यात आले. आज डीआरडीओ बहुविध आधुनिक  तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे, ज्यात एरोनॉटिक्स, शस्त्रे, लढाऊ वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, अभियांत्रिकी प्रणाली, क्षेपणास्त्रे, सामुग्री , नौदल प्रणाली, सिम्युलेशन, सायबर, जीवन विज्ञान आणि संरक्षणासाठी इतर तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

Exit mobile version