Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरात काही लाख प्रशिक्षित वाहनचालकांची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन चालकांना चालक प्रशिक्षण केंद्रांमधून वाहनं चालवण्याचं रितसर प्रशिक्षण द्यायची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

गडकरी यांच्या हस्ते काल नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

देशात आजही २२ लाख प्रशिक्षित चालकांची कमतरता असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. वाहन चालक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी राज्याला सर्वोतोपरी मदत करायचं आश्वासनही गडकरी यांनी दिलं.

यावेळी गडकरी यांनी देशभरात रस्ते अपघातांचं प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या जीवितहानीची माहितीही दिली. नागपूरमधे अपघात प्रतिबंधक समिती स्थापन केल्यामुळे, रस्ते अपघातांचं प्रमाण २५ टक्क्यानं कमी झाल्याचं ते म्हणाले.

Exit mobile version