Site icon साप्ताहिक एकच ध्येय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री  विलासकाका  पाटील – उंडाळकर यांचं आज पहाटे सातारा इथं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.

सातारा जिल्ह्यातले काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे विलासराव पाटील उंडाळकर यांनी १९६७ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता.

१९६२ मध्ये त्यांनी सातारा जिल्हा बँकेत संचालक म्हणून प्रवेश केल्यानंतर गेली पाच दशकं ते जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते.

त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सलग ३५ वर्ष राष्ट्रीय काँग्रेसचं  प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी राज्याच्या सहकार, विधी आणि न्याय तसंच दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतरही सातारा जिल्ह्यातला कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अबाधित ठेवला होता.

उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातल्या उंडाळे या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धाजंली अर्पण केली आहे.

Exit mobile version