मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार ३६२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ४७ हजार ३६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ८८ शतांश टक्के इतके आहे.
काल २ हजार ७६५ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ४७ हजार ११ झाली आहे. सध्या राज्यात ४८ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काल २९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे या आजारामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार ६९५ झाली आहे. राज्याचा मृत्यू दर २ पूर्णांक ५५ शतांश टक्के इतका कायम आहे.
जळगाव जिल्ह्यात काल ३४ रुग्ण कोरोना मुक्त झाले. काल ६१ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे रुग्ण संख्या ५६ हजार ३९ झाली आहे. सध्या ४६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात काल ९ तर आतापर्यंत ७ हजार २४८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल १२ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णसंख्या ७ हजार ६४० झाली आहे. सध्या ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३०६ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.
नांदेड जिल्ह्यात काल २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ४९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ३२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून २१ हजार ५९८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३२८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ५७५ रुग्णांचा बळी गेला आहे.
जालना जिल्ह्यात काल ४८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ६६० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल १५ रुग्णांना या आजाराची लागण झाली. त्यामुळे रुग्णांचा आकडा १३ हजार २५२ वर गेला आहे. सध्या २४२ रुग्ण उपचाराधीन आहेत.
सातारा जिल्ह्यात काल २५२ तर आतापर्यंत ५२ हजार ३४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल १०३ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या ५५ हजार ६४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ९२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ७९४ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.