Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातर्फे सागरमाला सी-प्लेन सेवा प्रकल्पाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने काल महत्वाकांक्षी सागरमाला सी-प्लेन सेवा प्रकल्पाला सुरुवात केली. हवाई सेवा कंपन्यांच्या सहाय्याने निवडक मार्गांवर सी-प्लेन सुविधा सुरू करण्याची तयारी मंत्रालयातर्फे सुरू आहे. मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सागरमाला विकास कंपनीमार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी विविध ठिकाणांची चाचपणी केली जात आहे. सध्या गुजरातमध्ये केवाडिया आणि अहमदाबादमधल्या साबरमती रिव्हर फ्रंट दरम्यान अशी सेवा सुरू आहे.

देशभरात दळणवळण यंत्रणा भारताला विकसीत करून देशाला पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनवण्याच्या उद्देशाने ही सी-प्लेन सेवा सुरू केली जात असल्याचे केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले.

Exit mobile version