नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा म्हणजेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा भाग असलेल्या न्यू रेवाडी- न्यू मदार या हरियाणा आणि राजस्थानातून जाणाऱ्या मार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते न्यू अटेली ते न्यू किशनगंज दरम्यान धावणाऱ्या दीड किलोमीटर लांबीच्या आणि वीजेवर चालणाऱ्या जगातील पहिल्या डबल डेकर कंटेनर असलेल्या मालवाहू रेल्वेगाडीला हिरवा झेंडाही दाखवला जाणार आहे.
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासह राजस्थान आणि हरियाणाचे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या या न्यू रेवाडी- न्यू मदार रस्त्यामध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या नव्या नऊ मालवाहू स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये न्यू रेवाडी, न्यू अटेली आणि न्यू फुलेरा या तीन जंक्शन्सचाही समावेस आहे. या मार्ग सुरू झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम मालवाहू मार्गिकेदरम्यानचं दळणवळण आणखी सुरळितपणे होण्यास मदत होणार आहे.