Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एमजीने नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच केली

empty wooden plank on foreground,auto advertising backplate,california,USA.

मुंबई: एमजी मोटरने ‘हेक्टर २०२१’ अद्ययावत एक्सटेरिअर व इंटेरिअरसह १२.८९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. यात फर्स्ट इन सेगमेंट फीचर्स ड्युएल टोन एक्सटेरिअर व इंटेरिअर असून निवड करण्यासाठी विविध पर्याय आहेत. नव्या इंटरनेट एसयूव्हीमध्ये एक बोल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रिल, लक्झरीयस शँपेन व ब्लॅक ड्युएल-टोन थीमचे इंटेरिअर, १८ इंच स्टायलिश ड्युएल टोन थीमचे इंटेरिअर, १८ इंच स्टायलीश ड्युएल टोन अॅलॉय, हिंग्लिश व्हॉइस कमांड्ससह अपडेट केलेले आयस्मार्ट (i-SMART) व इतरही अनेक फीचर्स आहेत. हेक्टर २०२१ यातील ७ ,५ व ६ सीटरच्या पर्यायात उपलब्ध आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले, ‘एमजी येथे ग्राहकांच्या कल्पनेतील विश्व साकारण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. हेक्टर २०२१ ची निर्मिती करताना आम्ही ग्राहक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील तज्ञांचा अभिप्राय विचारात घेऊन बदल केले. अद्ययावत हेक्टरने या इंटरनेट एसयूव्हीला आपल्या सेगमेंटमधील अधिक आकर्षक पर्याय बनवला आहे.”

हेक्टर २०२१- ५ सीटर (१२.८९ लाख रुपयांपासून पुढे):

हेक्टर २०२१ ५ सीटर ही एक नवी बोल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रिलसह येते. याद्वारे ग्राहकांना निवांतपणाचा अनुभव देते. १८ इंच स्टायलिश ड्युएल-टोन अलॉय, सिडक्टिव्ह डार्क रीअर टेलगेट गार्निश आणि पुढील तसेच मागील स्किड प्टेट्सवर गनमेटल फिनिशिंगमुळे गाडीचा लूक अधिक आकर्षक दिसतो. यातील इतर सुविधांमध्ये समोरील बाजूस हवेशीर जागा, वायरलेस चार्जिंग व इंडस्ट्री फर्स्ट हिंग्लिश व्हॉईस कमांड्सचा समावेश आहे. बेस्टसेलिंग एसयूव्ही ही लक्झरीयस शँपेन व ब्लॅक ड्युएल-टोन थीम इंटेरिअर पर्यायांमध्ये असेल.

हेक्टर प्लेस २०२१- ७ सीटर (१३.३४ रुपयांपासून सुरू):

नव्याने आलेली ७ सीटर पर्यायातील हेक्टर प्लस ही इंटरनेट एसयूव्ही पॅनोरमिक सनरूफमध्ये येते. यातील दुस-या ओळीत ३ प्रोढ व तिस-या ओळीत २ मुलांना बसण्याची पुरेशी जागा आहे. ७ सीटरदेखील स्टाइल, सुपर, स्मार्ट व नव्या ‘सिलेक्ट’ ट्रीम लेव्हलसह येते.

हेक्टर प्लस २०२१- ६ सीटर कॅप्टन सीट्स ( १५.९९ लाख रुपयांपासून सुरू)

कॅप्टन सीटसह हेक्टर प्लस ६ सीटर ही १८ इंच अपडेटेड अॅलॉय, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग व ऑटो-डिमिंग आयआरव्हीएमसह येते.

आयस्मार्ट अपडेट्स:

ऑटो-टेक स्पेसमध्ये अग्रस्थानी राहण्यासाठी एमजी वचनबद्ध आहे. याच अनुषंगाने हेक्टर २०२१ मध्ये आयस्मार्टची सुविधा अपग्रेड करण्यात आली आहे. यात हिंग्लिश व्हॉइस कमांड्स देण्यात आल्या आहेत. एमजी हेक्टर २०२१ मध्ये क्रिटिकल टायर प्रेशरचे अलर्ट मिळण्याकरिता इंजिन स्टार्ट अलार्म आहे. इंटरनेट एसयूव्हीला आता सनरुफ (खुल जा सिम सिम), एफएम (एफएम चलाओ), एसी (टेम्परेचर कम कर दो) यासारख्या ३५ पेक्षा जास्त हिंग्लिश कमांड्स समजू शकते व त्यानुसार प्रतिसाद देऊ शकते. एमजी हेक्टर २०२१ मध्ये ६०+ कनेक्टेड कार फीचर्स असून त्यात अॅपल वॉचवर आयस्मार्ट अॅप, गाना अॅपमध्ये गाण्यासाठी व्हॉइस सर्च, वायफाय कनेक्टिव्हिटी, अॅक्युवेदरद्वारे हवामानाचा अंदाज अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

एमजी हेक्टर ही भारतातील पहिली इंटरनेट कार असून त्यात अनेक इंडस्ट्री-फर्स्ट सुविधा असून या सेगमेंटमध्ये तिने एक मैलाचा दगड रोवला आहे. त्यात ओटीए अपडेट क्षमता व सोफेस्टिकेटेड ४८व्ही माइल्ड-हायब्रिड आर्किटेक्चर आहे. या वाहनात २५ पेक्षा जास्त सुरक्षिततेच्या सुविधा आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, रिअर वायपर व वॉशर तसेच रिअर डीफॉगर इत्यादींचा समावेश आहे.

Exit mobile version