लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकर कटीबद्ध असल्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार लडाख ला सर्वांगीण विकास तसच लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांनी काल लडाखच्या प्रतिनिधी मंडळाला दिले. या प्रतिनिधी मंडळाने काल अमित शहा यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाख प्रदेशाचे सामरिक आणि भौगोलिक महत्त्व लक्षात घेता, तेथील भाषा, संस्कृती, भूमी संरक्षण, नागरिकांची रोजगार सुरक्षा आणि लोकसंख्येतील बदल आदी विविध प्रश्नांबद्दल या प्रतिनिधी मंडळाने यावेळी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये लडाखच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्य, लडाख पर्वतीय विकास परिषदेचे सदस्य तसेच भारत सरकार आणि लडाख प्रशासना दरम्यान कार्यरत प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.