पावसाने बाधित तिसऱ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात २ गडी बाद १६६ धावा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियानं ५५ षटकात २ बाद १६६ धावा केल्या आहेत.
सामना सुरु झाल्यानंतर केवळ २१ धावा झाल्यावर पावसामुळं खेळ थांबवण्यात आला होता. दुसऱ्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियानं जो बर्न्स आणि ट्रेव्हिस हेड यांना आराम देवून डेव्हिड वॉर्नर आणि युवा फलंदाज पुकोवस्की यांना संघात घेतलं आहे तर भारतीय संघानं मयंक अग्रवाल आणि उमेश यादव यांच्या जागी रोहीत शर्मा आणि नवदीप सैनी यांना संधी दिली आहे.
चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत असल्यामुळं हा सामना निर्णायक ठरणार आहे.