Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना लसीकरणाची आणखी एक व्यापक देशव्यापी रंगीत तालीम उद्या होणार

Neal Browning receives a shot in the first-stage safety study clinical trial of a potential vaccine for COVID-19, the disease caused by the new coronavirus, Monday, March 16, 2020, at the Kaiser Permanente Washington Health Research Institute in Seattle. Browning is the second patient to receive the shot in the study. (AP Photo/Ted S. Warren)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना लसीकरणाची आणखी एक व्यापक देशव्यापी रंगीत तालीम उद्या शुक्रवारी होणार आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने व्हावे यासाठी ही रंगीत तालीम महत्त्वाची ठरणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन ठिकाणी ही रंगीत तालीम केली जाणार आहे. यात सरकारी आरोग्य केंद्र, खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राचा समावेश असणार आहे.

देशभरात कोरोनावरील लसीकरण राबवण्यासाठी आरोग्य मंत्रालय सर्व आवश्यक पडताळणी करत आहे. औषध महानियंत्रकांनी दोन लशींच्या आपत्कालीन वापरला परवानगी दिली आहे.

देशभर ही व्यापक मोहीम राबवण्यासाठी कोविन हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. तसेच दररोज अहोरात्र काम करणारे कॉल सेंटरही तयार करण्यात आले आहे.

लसीकरणासाठी आवश्यक साहित्याचा आवश्यक साठा उपलब्ध असून शीतसाखळी देखील तयार करण्यात आली आहे.

सुमारे १ लाख ७० हजार आरोग्य सेवकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून तीन लाख लसीकरण तुकड्या तयार आहेत.

Exit mobile version