प्रदूषणामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : गोदावरी नदी संसद या स्वयंसेवी संस्थेनं काल गोदावरी नदीच्या पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण तपासलं.
पाण्याचे नमुने विष्णुपुरी प्रकल्पाच्या शंकर जलाशयातून घेतले. हा प्रकल्प नांदेड शहराच्या वरच्या भागात असून जिथं पाणी दूषित केलेलं नाही तिथं हे प्रमाण ९ पीपीएम किंवा ग्रॅम प्रतिलिटर आढळून आलं.तर, शहर परिसरात प्रदूषणामुळे गोदावरी नदीच्या पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण साडे सहा पीपीएम आढळलं आहे.