Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाला तातडीनं प्रस्ताव पाठवण्याची छगन भुजबळ यांची सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या बेमोसमी पावसानं ३ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रातल्या शेतपिकांचं नुकसान झालं आहे. एकूण २१७ गावांमधल्या ५ हजार ४६० शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

पावसामुळे निफाड, चांदवड, देवळा, कळवण, नाशिक, बागलाण या तालुक्यांमधे पिकांना, विशेषतः कांदा आणि द्राक्ष पिकांना याचा फटका बसला आहे.

बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाला तातडीनं प्रस्ताव पाठवण्याची सूचना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.

Exit mobile version