नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे.
आज सकाळी संपलेल्या २४ तासात देशभरातले १८ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याच काळात १२ हजार ५८४ नव्या रुग्णांचीही नोंद झाली.
यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ४ लाखाहून जास्त झाली आहे. यापैकी १ कोटी एक लाखाहून जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
या चोवीस तासात १६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं, कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ५१ हजारापेक्षा जास्त झाली आहे. सध्या देशभरात सुमारे २ लाख १६ हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.