Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना

लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

पुणे : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारी २०२० रोजी सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून संबंधित विभागांनी बिनचुक काम करुन लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या

कोविड-१९ लसीकरण मोहिम जिल्हा कृतीदल समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एडके, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, 16 जानेवारी रोजी पहिला डोस देण्यात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देखील वेळेत देण्याचे नियोजन करावे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे राबवावी, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, लसीकरण प्रक्रियेत सहभागी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून लसीकरणाचे काम चोखपणे पार पाडावे. यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी. लस साठवणूक केंद्राच्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना करुन विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी लसीकरणासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.

Exit mobile version