भारतीय स्टेट बँकेची कृषी कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना”
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी, थकीत असलेल्या कर्जांच्या मुद्दलांपैकी २० टक्के रकमेचा भरणा केल्यास, संपूर्ण कर्जमाफी करण्यात येत असून, शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने शेती कर्ज देण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२१ ही आहे.