राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला होणार सुरुवात
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधासाठी मुंबईत उद्यापासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. वांद्रे -बिकेसी कोविड सेंटर इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रतिक्षेत असलेली पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली कोविशिल्ड लसीचा १ लाख ३९ हजार ५०० डोसचा पहिला साठा बुधवारी मुंबईत दाखल झाला.धुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेसह महापालिका आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणाची तयारी पुर्ण केली आहे.
धुळे जिल्हा रुग्णालय, शिरपूर आणि दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय, तसंच साक्री ग्रामीण रुग्णालय, शहरातल्या देवपूर मधल्या प्रभात नगरातल्या आरोग्य केंद्रात लस दिली जाणार आहे. त्यासाठी १० हजार १४७ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रांवर दर दिवशी १०० जणांना कोविड लस देण्यात येईल. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणासाठी २१ हजार लसींचा साठा महापालिकेला उपलब्ध झाला आहे. उद्या होणा-या लसीकरणासाठी विभागनिहाय ३ विभागीय नोडल ऑफिसर नेमण्यात आलेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने सध्या ५० लसीकरण केंद्रांचे नियोजन केलं आहे. आरोग्य विषयक सेवा देणाऱ्या १९ हजार ८५ कोव्हीड योध्यांची नोंद महानगरपालिकेकडे झालेली आहे.