Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने नवोदितांच्या प्रतिभेला जोपासावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : नागपूरचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नृत्य, कला, साहित्य, संगीत या विविध कला व कलावंतासाठी मध्य भारतातील हक्काचे व्यासपीठ राहिले आहे. केंद्राने विविध उपक्रमाद्वारे रसिकांसाठी कलेचे दालन समृद्ध केले आहे. मात्र प्रस्थापित कलावंतांसोबतच नवोदितांच्या प्रतिभेलाही जोपासण्याचे काम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने करावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक मंडळाची बैठक आज सकाळी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्र संचालक डॉ.दीपक खिरवडकर, आस्थापना अधिकारी श्रीकांत देसाई उपस्थित होते. राज्यपालांनी या केंद्राच्या परीसराची पाहणी केली. ऑरेज सिटी क्राफ्ट मेळावा, लोकनृत्य महोत्सव, डॉ.वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह या रसिकप्रिय कार्यक्रमांचे आयोजन या केंद्रातर्फे करण्यात येत असल्याचे श्री.खिरवडकर यांनी सांगितले.

परीसरातील खाऊ गल्ली, ग्रंथालय, मृगनयनी केंद्र व 800 आसन क्षमता असलेल्या खुल्या रंगमंचाची पाहणी देखील राज्यपालांनी केली. तसेच शिल्पकलेसह परिसरातील मूर्तिकलेबाबतही त्यांनी जिज्ञासेने माहिती जाणून घेतली.

केंद्राचे कार्यक्रम अधिकारी दीपक कुलकर्णी, प्रेमस्वरूप तिवारी, गोपाल बेतावार, दीपक पाटील, गणेश थोरात, शशांक दंडे उपस्थित होते.

Exit mobile version