पिंपरी : तीन वर्षापुर्वी भिमा कोरेगावला झालेल्या दंगली प्रकरणातील संशयीत आरोपी संभाजी भिडे आणि इतर पंधराशे आरोपींना अद्याप पर्यंत अटक का झाली नाही ? या बद्दल आंबेडकरी चळवळीतील जनतेमध्ये अतिशय असंतोषाची भावना आहे. 28 जानेवारी 2021 रोजी या विषयी जाब विचारण्यासाठी पिंपरी ते मंत्रालय अशी दोन हजार कार्यकर्त्यांची दुचाकी वाहन रॅली आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये भिमा कोरेगाव हल्ल्यामधील आरोपींवर शिक्षेची कारवाई कधी होणार ? हा रास्त प्रश्न घेऊन हि रॅली होणार आहे. अशी माहिती भिमाकोरेगाव हल्ला विरोधी आंदोलन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली.
भिमाकोरेगाव हल्ला विरोधी आंदोलन समन्वय समितीच्या प्रमुख पदाधिका-यांची तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक शुक्रवारी (दि. 15 जानेवारी) पिंपरीत झाली. या बैठकीत सरकारच्या या विषयीच्या कारभाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. यावेळी आरपीआय (अ) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, कामगार नेते बाबा कांबळे, आरपीआय (अ) महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत, रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्षा सुवर्णा डंबाळे तसेच अनिता सावळे, रजनीकांत क्षिरसागर, अजिज शेख, महेंद्र सरवदे, शिवशंकर उबाळे, संतोष निर्सगंध, प्रमोद क्षिरसागर, मेघा आठवले, अंजना गायकवाड, सिकंदर सूर्यवंशी, गोपाळ मोटे, अजय गायकवाड, कुणाल वाव्हळकर, सतिश काळे, जयश्री एडके, धम्मराज साळवे, विनोद गायकवाड, यशवंत सुर्यवंशी, अमोल डंबाळे तसेच समन्वय समितीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
राहूल डंबाळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची संभाजी भिडे यांना या गुन्ह्यातून ‘क्लीनचीट’ देऊन वगळण्याची भुमिका आहे. हे देखील निंदाजनक आहे. राज्य सरकारने आता ‘डीले जस्टीज इन अलसो इन जस्टीज’ हि भुमिका लक्षात घेऊन भिमा कोरेगाव हल्लाप्रकरणी आंबेडकरी अनुयायांना न्याय देण्याबाबत विलंब होणार नाही. याबाबत ठोस आणि सत्कारात्मक पावले उचलावीत आणि या गुन्ह्याचे चार्जशीट तातडीने दाखल करावे. तसेच यातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल. यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीत करण्यात आली. तसेच गुरुवारी 28 जानेवारी पिंपरी ते मंत्रालय निघणा-या दुचाकी रॅलीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सरकारने कोरोना विषयक सांगितलेल्या नियमांचे पालन करुन सहभागी व्हावे असे आवाहन डंबाळे यांनी केले.