राज्यात काल पहिल्या दिवशी १८ हजारावर लाभार्थींना लस
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या २८५ लसीकरण केंद्रांवर काल सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक म्हणजे सुमारे ६४ टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याचं आढळलं नाही, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं.