Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मध्यप्रदेशात बर्ड फ्ल्युचा शिरकाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई तसेच मध्यप्रदेशातल्या खेडा रोड येथील केंद्रिय कुक्कुट पालन क्षेत्रातही आता बर्ड फ्ल्युचा शिरकाव झाल्याचे काल मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने सांगितले. मध्य प्रदेशातल्या पन्ना, सांची, राईसेन, बालाघाट या शहरांमधल्या कावळ्यांमध्येही आता हा रोग पसरला आहे. तसेच हरिद्वार आणि उत्तराखंडच्या काही परिसरातील कावळ्यांनाही या रोगाची लागण झाल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.

बर्ड फ्ल्यु संक्रमित परिसरात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, तसेच आवश्यक त्या उपाययोजनाही करण्यात येत आहेत. राज्यांनी पोल्ट्री उत्पादनावरील बंदीचा पुनर्विचार करावा तसेच संक्रमण नसलेल्या भागातून आलेल्या उत्पादनांच्या विक्रीचा विचार करण्याचे मंत्रालयाने सुचवले आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच राज्य सरकारांनी प्राणी संरक्षण आणि संसर्गजन्य रोग प्रतिबंधक अधि-नियम, २००९ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करावा, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

Exit mobile version