मुंबईतील ७८% भाडेकरूंचे २०२१ मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न: नोब्रोकर
Ekach Dheya
मुंबई: कोरोना साथीच्या काळात लोकांना स्वतःच्या घराची गरज प्रकर्षाने जाणवली असून मुंबईतील ७८% भाडेकरू २०२१ मध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पहात असल्याचे नोब्रोकर डॉटकॉमच्या ‘इंडिया रिअल इस्टेट रिपोर्ट २०२०’ मधून निदर्शनास आले आहे. सोसायटीत राहण्याची इच्छा असलेल्या खरेदीदारांची संख्याही मुंबईत सर्वाधिक (८२%) आहे. शहरात स्वतंत्र घराची कमतरता असल्याने तसेच वाढीव सुरक्षा आणि सोसायटीत असलेल्या निवासासाठीच्या सोयी यामुळे हा ट्रेंड दिसून येत असल्याचे या रिअल इस्टेट पोर्टलच्या पाहणीतून निदर्शनास आले आहे.
रिअल इस्टेट रिपोर्ट २०२० मधील मुंबईतील मालमत्ता खरेदीतील प्रमुख ट्रेंड्स:
मुंबईत घर शोधणा-यांपैकी बहुतांश (८७%)) लोक रेडी-टू-मूव्ह-इन किंवा रिसेलच्या घरांना प्राधान्य देतात. अंडर-कंस्ट्रक्शन प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या लोकांना आलेल्या अडचणी पाहता हा एक योग्य पर्याय ठरतो. मुंबईतील सुमारे तीन चतुर्थांश (७३%) लोक हे पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत असून बहुतांश खरेदीदार (९२%) कायमस्वरूपी मालमत्ता तर ८% लोक गुंतवणूकीच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करत आहेत. नवीन घर खरेदी करताना मुंबईतील जवळपास ६७% नागरिक वास्तूच्या नियमांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्व देतात.
मुबईत मालमत्तेचा शोध घेणा-यांपैकी सर्वाधिक २०% लोक घर खरेदीसाठी १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त बजेटचे घर घेण्यास उत्सुक आहेत. यामागे या भागातील प्रॉपर्टीचे वाढीव दर तसेच स्टँप ड्युटीच्या शुल्कात झालेली कपात ही कारणे असावीत असा अंदाज आहे. मुंबईमध्ये १ बीएचके घर शोधणा-या लोकांची संख्या (४९%) सर्वाधिक आहे. शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर साथीच्या आजाराचा परिणाम झाल्याने दर चौरस फूट किंमतीत ३.७% एवढी घसरण दिसून आली. हे भारतातील बहुतांश मोठ्या शहराततील ट्रेंडनुसारच आहे.
टॉप रेंटल ट्रेंड्स:
मुंबईतील भाडेकरूंपैकी बहुतांश लोक रिअल इस्टेट ब्रोकर्सना सक्रियतेने टाळत होते. प्रतिसाद देणा-यांपैकी ४३% लोक रियल इस्टेट वेबसाइटची निवड करतात तर ४१% लोक त्यांच्या सामाजिक संबंधांतून, मध्यस्थांकडून शोध घेतात. अनावश्यक ब्रोकरेज शुल्क टाळण्यासाठी हे केले गेले असावे.
सुरक्षा ही मुंबईतील ६६% भाडेकरूंसाठी सर्वात महत्त्वाची सुविधा आहे. त्यापैकी १३% लोकांनी सुरक्षिततेसाठी व्हिजिटर व सोसायटी मॅनेजमेंट अॅपच्या शोधात असल्याचे म्हटले. स्वतंत्र घर आणि स्वतंत्र मजल्यांऐवजी सोसायटीत निवास शोधणाऱ्या भाडेकरूंचे प्रमाणही मुंबईत सर्वाधिक (७५%) एवढे आढळून आले.
साथीच्या काळात डिजिटल पेमेंट टूलचा सर्वाधिक वापर झाला. मुंबईतील दोन तृतीयांश (63%) भाडेकरूंनी त्यांचे भाडे बँक ट्रान्सफर किंवा नोब्रोकर पेच्या माध्यमातून दिले. डिजिटल व्यवहारांमध्ये मुंबई आणि पुण्याने बाजी मारली. त्यापैकी २४% लोकांनीच रोख रकमेद्वारे व्यवहार केला. मुंबईतील ८८% भाडेकरूंनी त्यांचे रेंटल अॅग्रीमेंट करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलचा वापर करतात. इतर शहरांपेक्षा हे पुन्हा एकदा सर्वाधिक प्रमाण आहे.
साथीच्या पार्श्वभूमीवर या भागाने नकारात्मक भाडेवाढ अनुभवली. मागील वर्षाच्या तुलनेत, १.५६% नी सरासरी भाडे घटले.
कोरोना काळात मालकांनी जपली माणूसकी:
कोव्हिड-१९ संकटाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नोब्रोकर डॉटकॉमने आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण केले. मुंबईतील सर्वेक्षण केलेल्या मालकांपैकी जवळपास निम्म्या (४९%) घरमालकांनी लॉकडाऊनदरम्यान भाडेकरूंच्या फायद्यासाठी काही भाडे माफ केले.
शहरातील ७९% घरमालकांनी भाड्यासाठी संपूर्ण कुटुंबाला प्राधान्य दिले. मुंबईतील फक्त १९% घरमालकांनी बॅचलर्सना भाड्याने घर देण्याची इच्छा व्यक्त केली.
नोब्रोकर डॉटकॉमचे सहसंस्थापक आणि सीबीओ सौरभ गर्ग म्हणाले, “२०२० मधील हे ट्रेंड्स साथीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण करणे कठीण आहे. या साथीने लोकांना स्वत:च्या घराची किंमत कळाली. सहभागींपैकी ७८% लोक २०२१ मध्ये घर खरेदीचा विचार करत आहेत. विषाणूच्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या सुरक्षेच्या चिंतेमुळे खरेदीदार तसेच भाडेकरूंना सोसायटीतील निवासाची गरज भासली, जेथे नव्या काळातील अॅपद्वारे निवासाचा अनुभव वृद्धिंगत केला जातो. हा ट्रेंड यापुढेही टिकून राहिल असे आम्हाला वाटते.”