सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू
Ekach Dheya
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही.कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून उद्या तज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल,अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल संध्याकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनास्थळी उपस्थित पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,आमदार चेतन तुपे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी माहिती घेतली.