Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीचा निर्णय – सुनील केदार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा निर्णय राज्यसरकारने घेतला. असून विविध टप्प्यांत मृत पावलेल्या पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली. रोग नियंत्रण ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत त्यासाठी १३० लाख रुपये मंजूर केले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

त्यानुसार आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणाऱ्या मृत पावलेल्या प्रती पक्षाला रु. २० सहा आठवडे वयापर्यंतच्या मांसल कुक्कुट पक्षासाठी रु. २० प्रति पक्षी, सहा आठवडे वयापर्यंतचे बदकासाठी रू. ३५ प्रति पक्षी. बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुटआणि इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याचं केदार यांनी सांगितलं.

Exit mobile version