कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेण्याच्या सूचना
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेणे, तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकर चाचण्या घेणे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही आढावा घेताना केल्या. पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेण्यात आली.
पुणे शहर आणि जिल्ह्यात ‘कोरोना’ची संख्या अजूनही पुरेशा प्रमाणात कमी झालेली नाही. ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेल्या काही प्रवाशांमध्ये नवीन स्ट्रेनचे काही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत माहिती घेऊन त्यांची तपासणी आणि चाचण्या करा, तसेच कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.