Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात आतापर्यंत १५ लाख ८२ हजार दोनशे एक लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत एकंदर १५ लाख ८२ हजार दोनशे एक लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत १५००० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९६.८३ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत देशभरात १,३,००,००० लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. तर १,८४,४०८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. गेल्या २,४१,४८४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून बाधितांची एकंदर संख्या १ ,६,००,००० पलीकडे गेली आहे. तर याच कालावधीत १५५ जणांचा मृत्यू झाला असून एकंदर मृतांची संख्या १५३३३९ झाली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांमध्ये विविध प्रयोगशाळांमध्ये ७८१००० हजाराहून अधिक कोरोना विषाणूच्या नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून देशात आतापर्यंत १९,१७,००,००० लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Exit mobile version