पोर्तुगालमध्ये टाळेबंदी असूनही आज अध्यक्षपदासाठी निवडणूक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालमध्ये आज अध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, पोर्तुगालच्या घटनेनुसार, आपत्तीजनक स्थितीतही निवडणुका पुढे ढकलण्यात येत नाहीत. त्यामुळे आज केवळ मतदान करण्यासाठी तसंच अत्यावश्यक कारणासाठीच नागरिकांना घराबाहेर पडण्याची अनुमती देण्यात आली आहे.