Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताचा आर्थिक वाढीचा दर यंदा साडे अकरा टक्के राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा भारताचा आर्थिक वाढीचा दर साडेअकरा टक्के राहील, असा अंदाज, आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं व्यक्त केला आहे.

कोरोना संकटाच्या काळात, दोन आकडी आर्थिक वाढ नोंदवणारा, भारत हा जगातला एकमेव देश ठरण्याची शक्यताही नाणेनिधीनं वर्तवली आहे.

यामुळे जगात सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगात भारताची ओळख पुन्हा निर्माण होऊ शकते. यंदाच्या ताज्या आकडेवारीत भारताच्या खालोखाल चीन ८ पूर्णांक १ दशांश टक्के, तर स्पेन ५ पूर्णांक ९ दशांश टक्के दर नोंदवून तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

Exit mobile version