Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा ; सचिन साठे

पिंपरी : समाज सेवा आणि राजकारणात प्रवेश करताना युवकांनी व्यक्ती पेक्षा विचारांवर निष्ठा ठेवून काम केले तर निश्चितच यश मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी साठे यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी साठे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे आणि शाम अगरवाल, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, हरीदास नायर, भाऊसाहेब मुगूटमल, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ, सुनील राऊत, मेहताब इनामदार, विश्वनाथ खंडाळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, ॲड. अनिरुध्द कांबळे, शोभा पगारे, संदेश बोर्डे, स्नेहल गायकवाड, निता चामले, प्रतिभा कांबळे, ऋषिकेश थोरात आदी उपस्थित होते.

साठे यांच्या हस्ते शहर सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, तुषार पाटील, वसीम शेख आणि चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस पदावर रोहित शेळके, शैलेश अनंतराव, नीता चीमाले, डेव्हिड श्री सुंदर, जीफिन जॉन्सन, स्तुती अडागळे, सिमा पाटील तसेच पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस पदी विवेक भाट यांना पत्र देण्यात आले.त्याचबरोबर भोसरी विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस पदावर मयुर रोकडे यांनाही पत्र देण्यात आले.

साठे म्हणाले की, राजकारणात पदाच्या मागे धावून उपयोग होत नाही, पदापेक्षा कामाच्यामाध्यमातून आपले नाव कमवा त्यातूनच आपली पत निर्माण होईल. पत एकदा निर्माण झाली की, पदं आपोआप मिळतात. व्यक्तीनिष्ठा कायमस्वरूपी टिकत नाही तर विचारांची बांधीलकी चिरंतर टिकून राहते असेही साठे म्हणाले.

Exit mobile version