नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात ते “मानव कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे चौथी औद्योगिक क्रांती” याविषयी बोलणार आहेत.
यावेळी ते जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कोविडनंतरच्या काळात पुन्हा चांगली सुरुवात करण्याच्या दृष्टीने दावोसचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान पंतप्रधान आज दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या फेरीला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्कराच्या तिनही दलांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.