प्रधानमंत्री ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवर उद्या सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा त्र्याहत्तरावा भाग आहे. या कार्यक्रमाचं आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सगळ्या वाहिन्यांवरून, तसंच आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि newsonair या मोबाइल अॅपवरून प्रसारण केलं जाईल.
याशिवाय आकाशवाणी, दूरदर्शनची वृत्तवाहिनी, प्रधानमंत्र्यां कार्यालय, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतरच त्याच्या स्थानिक भाषांमधल्या अनुवादनाचं प्रसारण होईल. याशिवाय स्थानिक भाषांमधल्या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाईल.