Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई महानगरपालिकेनं ३१ मार्च २०२१ पर्यंत सात जंम्बो कोविड सेंटर सुरु ठेवायचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारी १ फेब्रुवारीपासून मुंबईतली उपनगरीय रेल्वेसेवा सर्व सामान्यांसाठीही सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, गर्दी वाढल्यानं, कोरोनाचे रुग्णही वाढायची शक्यता गृहीत धरून मुंबई महानगरपालिकेनं ३१ मार्च २०२१ पर्यंत सात जंम्बो कोविड सेंटर सुरु ठेवायचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयं कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. लोकल प्रवासादरम्यान मास्कचा वापर, परस्परांपासून सुरक्षित अंतराचा नियम पाळणं बंधनकारक असणार आहे.

Exit mobile version