Site icon साप्ताहिक एकच ध्येय

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ असे संबोधले जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला, कुसुमाग्रज नगरी असे संबोधले जाणार आहे.

काल नाशिक येथे गोखले एज्युकेशन सोसायटीत जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष, छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली, पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान दिल्याबद्दल, भुजबळ आणि आयोजक लोकहितवादी मंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले आहे.

संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि घोषवाक्याचे प्रकाशनही काल करण्यात आले.

Exit mobile version