केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी-बारावीची चार मे पासून परीक्षा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईनं इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक काल जाहीर केलं. या दोन्ही परीक्षा चार मे ते ११ जून या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं मंडळानं सांगितलं आहे.
दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोग-युजीसीकडून ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी घेण्यात येणारी नेट परीक्षा येत्या दोन मे पासून होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी ही माहिती दिली. ही परीक्षा ऑनलाईन होणार असून, याबाबतची अधिक माहिती युजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर असल्याचं त्यांनी सांगितलं.