Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लष्कर मुख्यालयाच्या फेररचनेसंदर्भातल्या निर्णयांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून मान्यता

नवी दिल्ली : लष्कर मुख्यालयाच्या फेररचनेबाबतच्या निर्णयांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. मुख्यालयाने केलेल्या तपशीलवार अंतर्गत अभ्यासावर आधारित ही परवानगी देण्यात आली आहे.

लष्कर प्रमुखांच्या अधिपत्याखाली वेगळा सतर्कता विभाग सध्या सतर्कता ही बाब विविध एजन्सीमार्फत कार्यरत होती हे लक्षात घेऊन लष्करप्रमुखांच्या कक्षेअंतर्गत स्वतंत्र सतर्कता विभाग कार्यरत करण्यात येणार आहे. यासाठी लष्कर प्रमुखांच्या अधिपत्याखाली अपर महानिर्देशक यांना थेट ठेवण्यात येईल. यामधे भूदल, हवाई दल आणि नौदल अशा तीनही दलांचा कर्नल स्तराचा प्रत्येकी एक अधिकारी राहणार आहे.

मानव अधिकाराशी संबंधित मुद्यांवर अधिक लक्ष पुरविण्यासाठी लष्कर उपप्रमुखांच्या अधिपत्याखाली संघटना, मानवाधिकाराशी संबंधित बाबी आणि मूल्ये यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या दृष्टीने अपर महानिदेशकांच्या अध्यक्षतेखाली विशेष मानवाधिकार विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कर उपप्रमुखांच्या थेट अधिपत्याखाली हा विभाग राहील.

Exit mobile version