नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर पोचला आहे. देशभरात काल १७ हजार ८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १२ हजार ८९९ नवे रुग्ण सापडले, तर देशभरात १७० रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १ कोटी ७ लाख ९० हजार १८३ जणांना कोरोनाची लागण झाली.
त्यापैकी आतापर्यंत १ कोटी ४ लाख ८० हजार ४५५ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ५४ हजार ७०३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात १ लाख ५५ हजार २५ रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत बाधीत झालेल्यांपैकी सध्या एक्टीव्ह असलेल्या रुग्णांचं प्रमाण १ पूर्णांक ४४ शतांश टक्के आहे.
देशभरात आतापर्यंत ४४ लाख ४९ हजार ५५२ जणांचं कोरोना लसीकरण झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.