मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या काही भागात लोकसंख्या वाढल्यानं काही प्रभागांच्या विभाजनाचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. मालाडच्या पी उत्तर या प्रभागाचा यात समावेश आहे. प्रभागाच्या विभागणीला सुरुवात झाली असल्याची माहिती आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली.
मालाड – मालवणी या भागातली लोकसंख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. या भागाचे मालाड पूर्व आणि मालाड पश्चिम असे दोन विभाग केले जाणार आहेत. प्रभागांच्या विभाजनासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.