मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवसेनेचं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन आज आंदोलन केलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीवर उभं राहून केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढीविरोधाचा निषेध व्यक्त केला. वांद्रे इथं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं इंधन दरवाढी विरोधात निवेदन दिलं. आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.
लातूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली औसा उदगीर इथं आंदोलन करण्यात आलं.
नाशिक जिल्ह्यात आज शहरप्रमुख सुधाकर बडगुजर, वसंत गीते यांच्या नेत्तृत्त्वाखाली इंधन दरवाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आलं.
जालना शहरातल्या गांधीचमन चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात आज पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
धुळे जिल्ह्यात आग्रारोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शिवसेनेने बैलगाडी मोर्चा काढला.
साताऱ्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्त शिवसेनेचे आंदोलन झाले
उस्मानाबाद इथं शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात गाडी ढकलून निषेध व्यक्त करण्यात आला.
चंद्रपुरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेनं गांधी चौकातून मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढत ही दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी शिवसैनिकांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तहसीलदार कार्यालयावर शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चे काढण्यात आले आणि तहसीलदारांना निवेदन दिलं.