नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंच्या संघानं ५७८ धावांचा डोंगर उभारला. आज तिसऱ्या दिवशी कालच्या ८ गडी बाद ५५५ धावसंख्येवरून पुढे खेळताना इंग्लंडनं त्यात २३ धावांची भर घातली.
भारताच्या वतीनं जसप्रित बुमराह आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर इशांत शर्मा आणि शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
त्यानंतर पहिल्या डावासाठी मैदानात उतरलेल्या भारताची फलंदाजी मात्र गडगडली. भारतानं केवळ ७३ धावांमधेच सलामीवीर रोहित शर्म आणि शुभमन गीलसह, कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांना गमावलं. मात्र चेतश्वर पुजारा याच्या संयमी तर ऋषभ पंतच्या आक्रमक अर्धशतकी खेळीनं भारताचा डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं ४ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या.