“श्री फाउंडेशन” तर्फे थेरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
Ekach Dheya
पिंपरी : थेरगाव येथील “श्री फाउंडेशन” तर्फे 1 फेब्रुवारी 2021 रोजी विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रथम कोरोना कालावधीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य केलेले सामाजिक संस्था (थेरगाव सोशल फांऊडेशन, विवेकानंद केंद्र, रियल लाइफ रियल पीपल्स, तुलसी मानस मंडळ, पोलीस फ्रेंड्स असो, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, इत्यादी) व विविध क्षेत्रातील व्यक्ती जसे कि, वैद्यकीय अधिकारी /कर्मचारी, आरोग्य अधिकारी /कर्मचारी, डाॅक्टर, पोलीस अधिकारी /कर्मचारी, इत्यादींचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफल, वृक्ष, व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. तसेच “श्री फाउंडेशन” तर्फे दंत चिकित्सा, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप तसेच अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. विवेक मुगळीकर (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन), संतोष पाटील (गुन्हे पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन), दिनेश तावरे (नायब तहसीलदार, अन्न व नागरी पुरवठा विभाग), अँड. सचिनभाऊ भोसले (विद्यमान नगरसेवक), झामाताई बाळासाहेब बारणे (विद्यमान नगरसेविका), मायाताई संतोष बारणे (विद्यमान नगरसेविका), डाॅ. सुनिता इंजिनियर (वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, खिंवसरा पाटील रुग्णालय, थेरगाव ), सुरेश चन्नाल (आरोग्य निरीक्षक, ग प्रभाग), शरद लुनावत (मा. स्वीकृत नगरसेवक), गजानन चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच “श्री फाउंडेशनचे” संस्थापक/अध्यक्ष सुशांत पांडे, सल्लागार संदीप शिंदे, उपाध्यक्ष अविनाश रानवडे, डाॅ. अमित नेमाने, डाॅ. सतीश नगरकर, आशिष शुक्ला, संगीता जैन, आश्लेषा कांबळे, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी डाॅ. विवेक मुगळीकर यांनी श्री फाउंडेशनचे कौतुक केले व सर्व कोरोना योध्याना संबोधीत करताना त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन करून सर्वांना “कायदा व सुव्यवस्था” पालन करण्याचे आवाहन केले. तर सचिनभाऊ भोसले व मायाताई बारणे यांनी श्री फाउंडेशनच्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले व सर्व कोरोना योध्याना शुभेच्छा दिल्या. काय॔क्रमाचे प्रास्ताविक संदिप शिंदे, व सुत्रसंचालन हरीशअप्पा मोरे यांनी केले. तसेच संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. सुशांत पांडे यांनी आभार मानले.