Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना काळात विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडून ४ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात विनातिकीट आणि नियम मोडून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून १५ जून २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळात ४ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केला अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी तसंच लांब पल्याच्या गाड्यांसाठी हे विशेष अभियान चालवलं होतं. या काळात उपनगरी रेल्वे गाड्यांमधे १ लाख २१ हजार तर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या ३७ हजार ८२३ प्रवाशांकडून दंड वसूल केल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

Exit mobile version