देशात रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटना-अपघातांबद्दल गडकरी यांनी केली चिंता व्यक्त
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :येत्या २०२५ पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
“रस्ता सुरक्षिततेमधली आव्हाने आणि उपाययोजना” या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते काल बोलत होते. आंतरराष्ट्रीय रस्ते संघटनेच्या भारतीय शाखेने हा वेबिनार आयोजित केला होता.
देशात रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटना-अपघातांबद्दल गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. याबाबतीत भारत अमेरिका आणि चीनच्याही पुढे आहे असे ते म्हणाले.
अपघात कमी करण्याच्या उद्देशाने रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्चाचा उपक्रम प्रस्तावित असल्याचे गडकरी म्हणाले.
रस्ता सुरक्षितते संबंधी जागरूकता वाढवण्यासाठी सध्या देशभर रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे.