मधू जुमानी आणि जॅक गायकवाड यांचा लायन्स क्लबने केला गौरव
Ekach Dheya
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील झुंबा डान्स मार्गदर्शक मधू जुमानी आणि डान्स कोरीओग्राफर जॅक गायकवाड यांचा लायन्स क्लब ऑफ पुणे स्पेक्ट्रम या संस्थेच्या वतीने ‘बेस्ट झीन ऑफ पीसीएमसी’ आणि ‘बेस्ट कोरीओग्राफर ऑफ पीसीएमसी’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मासूळकर कॉलनी, पिंपरी येथे रविवारी (दि. 7 फेब्रुवारी) झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष लायन किशोर फेरवाणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी सचिव लायन महेश टपारीया, खजिनदार लायन त्रीप्ता सुरी, प्रकल्प संचालक लायन आनंद गायकवाड, प्रकल्प अध्यक्षा लायन सुजाता शेळके, लायन सुनिल चेकर, लायन इंद्रजित राणा, लायन कविता चेकर, लायन अमरजित राणा, लायन धरमवीर शर्मा, लायन सुशिला शर्मा आदी उपस्थित होते.
‘कोरोना कोविड -19’ या जागतिक महामारीमुळे देशभर 22 मार्च 20 पासून लॉकडाऊन करण्यात आले होते. सुमारे तीन महिण्यानंतर अंशता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. या काळात सर्वत्र भिती आणि नैराश्याचे वातावरण होते. अशा कठीण काळात सामाजिक जबाबदारीची जाणिव ठेऊन शहराचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ वाढविण्यासाठी अनेक व्यक्ती व संस्थांनी उल्लेखनिय काम केले. तसेच काम झुंबा डान्स मार्गदर्शक मधू जुमानी आणि कोरीओग्राफर जॅक गायकवाड यांनी शहरात विविध ठिकाणी केले. यामध्ये मोफत झुंबा डान्सची प्रात्यक्षिके सादर करुन नागरिकांमध्ये व्यायाम आणि आरोग्यविषयी जनजागृती केली. मधू व जॅक यांनी अनलॉक सुरु झाल्यानंतर दुर्गादेवी टेकडी, बर्ल्ड व्हॅली, पिंपळे सौदागर येथिल लीनीअर गार्डन तसेच मासूळकर कॉलनी परिसरात मोफत झुंबा डान्सची प्रात्यक्षिके सादर केली.
मागील महिण्यात आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस फाऊंडेशन आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सायक्लोथॉन’ स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी झुंबा डान्सचे प्रात्यक्षिक सादर करण्याची संधी मधू व जॅक यांना देण्यात आली. मधू आणि जॅक यांची नृत्यनिपुणता पाहुन खुद्द आमदार महेश लांडगे यांना देखील झुंबा डान्स करण्याचा मोह आवरला नाही. आमदार महेश लांडगे यांनी मधू आणि जॅक यांच्या बरोबर झुंबा डान्स केला त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता.
या कार्यक्रमाच्या आयोजनात लायन ममता टपारीया, लायन कमल किशोर पाडलीवाल, लायन संदिप जाधव, लायन तुषार सावर्डेकर, लायन अन्नू जेम्स, लायन शहाजी चव्हाण, लायन श्रृती चव्हाण, लायन रमेश शर्मा, लायन सुनिता शर्मा, लायन राजेंद्र शेळके आदींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात राहुल राठोड यांनीही नृत्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
स्वागत लायन किशोर फेरवानी, प्रास्ताविक लायन सुजाता शेळके, सुत्रसंचालन लायन आनंद गायकवाड आणि आभार लायन राजेंद्र शेळके यांनी मानले.