स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेकडून मुंबई हागणदारी मुक्त शहर घोषित
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियानांतर्गरत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेनं मुंबईला हागणदारी मुक्त शहर घोषित केलं आहे. मात्र मुंबईच्या काही भागात अजूनही शौचालयांचा तुटवडा आहे. सुमारे १६ हजार शौचालयांची गरज असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे.
केंद्राच्या अहवालानुसार मुंबई हागणदारी मुक्त करण्यासाठी शौचालयांची दुरुस्ती आणि शौचालयांच्या नव्याने बांधणीचा कार्यक्रन हाती घेतल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.