Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लातूर महानगरपालिका शहरात ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर महानगरपालिकेने ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता दिली आहे.

काल झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासह विविध ३४ विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन खरेदीसाठी १ कोटी तसेच महानगरपालिकेचा वाटा म्हणून ४ कोटी रुपयांचा निधी देण्यासही सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

हा प्रकल्प उभा केल्यास वीजेबाबत लातूर मनपा स्वयंपूर्ण होणार आहे. दरम्यान, नियमितपणे मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना १२ टक्के करसवलत देण्याचा निर्णयही महापालिकेनं घेतला आहे.

माजी सैनिक तसंच सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता कर माफ करण्यासही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने काल मंजुरी दिली.

Exit mobile version