शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज- शरद पवार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : बदलत्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल केलं. कृषिभूषण दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नवीन द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्ह्यात नान्नज इथं काल पवार यांच्या हस्ते पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
शेती सुधारण्यासाठी पिकांमध्ये बदल करणं, जमिनीचा पोत सुधारणं याकडेही शेतकर्यांकनी लक्ष देण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.