Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे २४९ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद ५४ धावा झाल्या आहेत.

त्यापूर्वी आज सकाळी भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर तर इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर संपुष्टात आला.

रविचंद्रन अश्विनने ४३ धावा देत, इंग्लंडचे पाच गडी बाद केले. इशांत शर्मा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक तर मोहम्मद सिराजने एक बळी घेतला.

आजच्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा शुभमन गील १४ धावांवर बाद झाला होता, तर रोहित शर्मा २५ आणि चेतेश्वर पुजारा सात धावांवर खेळत होते.

सामन्यात सध्या भारतीय संघानं २४९ धावांची आघाडी घेतली आहे. मालिकेत पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लंड संघ एक शून्यने आघाडीवर आहे.

Exit mobile version