Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोकशाहीचं मूळ हिंदू विचारधारेतच असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) :  हिंदू विचारधारा ही भारताच्या लोकशीचा मूलाधार आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज साप्ताहिक विवेक चे माजी संपादक,जेष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांच्या जन्मदिनाच्या अमृतमहोत्सानिमीत्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

हिंदू विचारांमुळेच देशात लोकशाहीची वाढ झाली असं फडनवीस म्हणाले. सध्या अनेक मार्गांनी देशाची लोकशाही कमकुवत करायचे प्रयत्न होत आहेत, मात्र आपली विचारधाराच यातनं मार्ग दाखवत असते असं ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपलेपणाची भावना ही देश आणि समाजासाठी महत्वाची असते.

आपल्या संविधानात स्वतंत्रता, बंधुता आणि समतेचा उल्लेख आहे. हे शब्द विदेशी नसून, भगवान गौतम बुद्धांच्या विचारांच्या प्रेरणेतून लिहीले गेले, असं संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहब आंबेडकर यांनी म्हटलं असल्याची आठवणही भागवत यांनी यावेळी करून दिली.

Exit mobile version